बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोरोनासंदर्भातील थेट खरेदी करण्यात आलेल्या मास्क , सँनिटायझर आणि साबणीत महाघोटाळा – दत्ताकाका साने

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेतील कोरोनासंदर्भातील थेट खरेदी करण्यात आलेले कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपाने आतापर्यंत किती मास्क , सँनिटायझर आणि इतर वस्तू किती खरेदी केल्या ? कोणत्या दराने? कोणत्या संस्थेकडून घेतल्या या संस्थेचे ठेकेदार कोण? याची माहिती मिळण्यात यावी तसेच या खरेदीत भारतीय जनता पार्टी यांनी महाघोटाळा करून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे.त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक दत्ताकाका साने यांनी केली आहे

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात साने यांनी म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने १२५ ग्रॅम वजनाच्या लाईफ बॉय साबणाची खरेदी केली आहे. या खरेदी पोटी ३२ लाख २७ हजार २०० रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.सव्वाशे ग्रामची २५ रुपयांची साबणाची छोटी वडी सव्वाशे रुपयांना खरेदी केली आहे. कार्योत्तर मंजूरीसाठी स्थायी समितीकडे आलेल्या या विषयात एवढ्या रकमेत किती साबण खरेदी केले ?. या खरेदीला कोणत्या समितीने मान्यता दिली? . तसेच लाईफ बॉय साबणच का खरेदी केले गेले ? याचा उल्लेख प्रशासनाने करणे गरजेचे होते पण तसे न करता थेट खरेदी करून भाजपने भ्रष्टाचाराचे कुंपनच तयार केले आहे

तसं म्हटलं तर पालिकेने कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर केलेल्या खरेदीतील हा एक अत्यंत छोटा भाग आहे. परंतु हा छोटासा भाग संपूर्ण खरेदीतील अनियमितांवर प्रकाश टाकणार आहे. पालिकेने नेमके किती साबण खरेदी केले याचा उल्लेख केला नसल्यामुळे अगदी साधा हिशोब केला तर साधारणपणे १२५ रुपयांना एक साबण खरेदी केल्याचे दिसून येते. बाजारात जी वस्तू पंचवीस ते तीस रुपयांना सहज उपलब्ध आहे ती १२५ रुपये अशी का खरेदी केली.

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने काही तातडीची खरेदी केली आहे. त्यात राज्य शासनाने पुरवठा न केल्याने खरेदी करण्यात आलेल्या पीपीई किट्सचा समावेश आहे. त्यासाठी पालिकेने सुमारे ६९ लाख रुपये खर्च केले आहेत. इतरही आणखी बरीच खरेदी आहे. परंतु अशी खरेदी करताना करण्यात आलेल्या अनियमितता आता लक्ष वेधून घेत आहेत. आपत्तीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारची खरेदी थेट पद्धतीने करता येत असली तरी त्याला काही नियम असतात. केवळ मनात आले म्हणून काहीही करून चालत नाही.तशी पालिकेने अनेक वस्तूंची खरेदी केली आहे. सर्व प्रकारच्या खरेदीमध्ये अनेक उणीवा आहेत. अनेक ठिकाणी अमुक एक वस्तू खरेदी केली ती वस्तू कोणती होती? ती किती खरेदी करायची होती? ती करण्यासाठी कोणत्या कमिटीचे मान्यता घेतली? अमुक एका कंपनीचीच वस्तू का खरेदी केली ? वगैरे गोष्टींचा अजिबात उल्लेख केलेला का नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने कोरोनाच्या ’टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे हे स्पष्ट दिसत आहे. कुठल्याही संकटाचा किंवा आपत्तीचा गैरफायदा घेण्यात या वृत्तीच्या लोकांना काही वाटत नाही. कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अनेक सार्वजनिक संस्थांना विविध प्रकारची खरेदी थेट करण्याची मुभा असते. आपत्तीच्या कालावधीत अडचणीत असलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून अशा प्रकारची सोय कायद्यात केलेली आहे. परंतु अशा सोयीचा गैरफायदा घेण्यात भारतीय जनता पार्टी आघाडीवर असलेली दिसून येते म्हणून संबंधित अधिकारी ठेकेदार यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे . तसेच या खरेदी विक्रीत भाजपा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो असेही ते म्हणाले

Share this: