घरभाडे दिले नाही म्हणून घरमालकांने भाडेकरूला केली बेदम मारहाण ;चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) देशात 17 मेपर्यंत लाॅकडाऊन असून सरकारने भाड्याने रहात असलेल्यांकडून भाडे वसूल करू नये अशी घोषणा केली होती .माञ घरभाडे दिले नाही आणि घर सोडताना घरही स्वच्छ केले नाही याचा राग मनात धरून घर मालकाने भाडेकरूला बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे घडली आहे.
याप्रकरणी वाल्मिक गोनीनाथ जगताप ( वय 48 , रा . पंतनगर , जाधववाडी , चिखली ) यांनी मंगळवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
त्यानुसार मंगल धनवे , तुषार धनवे , मंगल धनवे यांचा पती , एक अनोळखी महिला व इतर सात ते आठ अनोळखी पुरूष ( नाव , पत्ता माहिती नाही )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी वाल्मिक हे आरोपींकडे भाड्याने राहण्यास होते . त्यांनी घर सोडताना खोलीची साफसफाई केली नाही . तसेच उर्वरित घरभाडेही दिले नाही . या कारणावरून त्यांच्यात वाद झाला . मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी मोटार तसेच तीन दुचाकीवरून फिर्यादी वाल्मिकी यांच्या घरी आले . आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली . त्यावेळी त्यांचा मुलगा राहूल आणि मुलगी कोमल हे दोघेजण आईला वाचविण्यासाठी आले . त्यावेळी सोबत असलेल्या इतरांनी त्या दोघांना हाताने मारहाण केली . मुलगा राहूल यास पार्किंमध्ये ओढत नेत त्यास लोखंडी रॉडने मारहाण केली . आपल्या कुटूंबास मारहाण होत असल्याची माहिती मिळताच दुसरा मुलगा मोटारीतून आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली . तसेच रोहित याच्या मोटारीच्या काचा फोडून व इतर ठिकाणी मारून मोटारीचे नुकसान केले .अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.