सततच्या अतिक्रमण कारवाईला कंटाळून भाजी विक्रेत्याची आत्महत्या; प्रशासनाच्या विरोधात गणेश आहेर यांचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सततच्या अतिक्रमण कारवाईला कंटाळून चिखली घरकूल येथील योगेश वैजनाथ म्हेञे या भाजी विक्रेत्यांनी आत्महत्या करून आपला जीव गमवला आहे.आत्महत्या केलेल्या भाजी विक्रेत्याच्या कूटूंबाला महापालिका प्रशासनाने त्वरीत आर्थिक मदत दिले गेले पाहिजे आशी मागणी गणेश आहेर प्रसिद्धी पञकाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करत आहे.
लोकडाऊंड सूरू झाल्यापासून गोरगरीबांच जीवन जगण हलाकिच झाल असतांना आपल कूटूंब जगवण्यासाठी भाजी विक्रेता धडपड करून आपल घर चालवत असतांना महापालिका अतिक्रमण विभाग माञ त्यांच जिवन जगण मुश्किल करत आहे.
भाजी विक्रेत्यांना महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिशय चूकिच्या पध्दतीने अतिक्रमण कारवाई करून विस्तापित करण्यात येत आहे.अनेक गोरगरीबांच जीवन उध्वस्त झाल आहे अश्या परिस्थिती मध्ये देखील महापालिका हातगाडी वर व रस्त्यावर भाजी घेवून बसा-यांना मोठ्या प्रमाणात मनमनी पध्दतीने त्यांचा वजन काटा हातगाडी ताब्यत घेवून त्यांना उध्वस्त करण्याचं काम महापालिका प्रशासन करत असल्याचा आरोप मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी प्रसिद्धी पञकात केला आहे.
येणार्या काळात जर अश्या पध्दतीने हातगाडी धारकांना वागणूक मिळणार असेल तर माञ महापालिका प्रशासना विरोधात तिव्र अस आदोंलन छेडण्याचा इशारा मातोश्रीे सामाजिक संस्थेचे गणेश आहेर व पदाधिकारी अधिकराव भोसले. गोरख पाटील. गणेश पाडूळे. माऊली जाधव. रविकिरण घटकार. प्रदिप दळवी. अंकूश कोळेकर. बाळासाहेब गायकवाड. निलेश भोरे. मारुती म्हस्के. दत्ता गिरी. गणेश वाळूंज. यांनी या वेळी दिला आहे.