क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी टायगर ग्रुपच्या शहराध्यक्षासह सहा आरोपींना अटक

वाकड (वास्तव संघर्ष) :वाकड येथील एका मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण करून त्या मेडिकल व्यवसायिकाकडे सहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.15) रोजी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली आहे. याबाबत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

अशोक बेलिराम आगरवाल ( वय 53 , रा . विकास नगर , किवळे ) असे सुटका झालेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव आहे . त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

टायगर ग्रुपचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड ( वय 32 ) , राहुल छगन लोंढे ( वय 24 ) , प्रकाश मधुकर सजगणे ( वय 31 , तिघे रा . अष्टविनायक कॉलनी , वाकड ) , प्रीतेश बबनराव लांडगे ( वय 30 , रा . प्रभात कॉलनी , वाकड ) , कमलेश राजकुमार बाफना ( वय 32 , रा . वाकड ) , संतोष बापूओव्हाळ ( वय 28 , रा . वाकड ) आकाश विजय हारकरे ( वय 27 , रा . चिखली ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या काही अनोळखी व्यक्ती आगरवाल यांच्या मेडिकलमध्ये घुसले . त्यांनी पोलीस असल्याचे सांगत कपाटातील एमटीपी कीट, दोन फायली घेऊन मेडिकलमध्ये हे औषध तुम्हाला ठेवता येत नाही ठेवल्यास यावर 302 चा खुनाचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो . सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल , अशी भीती दाखवीत फिर्यादी आगरवाल यांना जबरदस्तीने त्यांच्या मोटारीत बसविले. दत्त मंदिर वाकड रस्त्यावर फिरवून आगरवाल व डॉ.खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली व एक तासाच्या आत पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली . या प्रकाराबाबत डॉ.खरे यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन लावून विचारपूस केली .

त्यावेळी ते म्हणाले की , आमचे कोणीही पोलीस आले नाहीत . त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक अशोक जगताप व विजय वेळापुरे यांना घटनास्थळी पाठविले . या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता डांगे चौक गाठले असता आरोपी त्यांना बघून पळू लागले . त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली व फिर्यादी आगरवाल यांची सुटका करण्यात आली .दरम्यान आरोपीला न्यायालयाने आज एक दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे.

Share this: