बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड ‘घरकुल’ योजनेला अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी  चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे सेक्टर नंबर -12 आणि वाल्हेकरवाडी सेक्टर नंबर 30 , 32 येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी हा गृहप्रकल्प आहे. यातील सदनिकांसाठी 18 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आली होती. आता या गृहप्रकल्पाकरिता अर्ज करण्यास 3 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने पेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस गटाकरिता (अनुसूचित जमाती) 29 सदनिका व विमुक्त जाती (डीटी) करिता दोन सदनिका अशा 31 सदनिका, एलआयजी प्रवर्गातील 793 सदनिका व पेठ क्रमांक 30-32 येथील ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील 366 सदनिका व एलआयजी (वन बीएचके) प्रवर्गातील 414 सदनिकांचा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

प्रकल्पातील घरांचा डिसेंबर 2022 पूर्वी ताबा देण्यात येणार आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.ही मुदत 3 नोव्हेंबर 2022  पर्यंत वाढविण्यात आली आहे.ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता www.pmrda.gov.in व http:lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Share this: