बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत जिग्नेश मेवानी यांची सभा घेणा-या ‘त्या’ भाजप नगरसेवकावर कारवाई करणार – गिरीश बापट

पिंपरी (वास्तव संघर्ष) आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील महायुतीचे सत्ता पुन्हा येईल पिंपरी चिंचवड मधील महायुतीचे उमेदवार पहिल्या मता पेक्षा अधिक मतांनी आमचा विजय होईल असे खासदार गिरीश बापट यांनी आयोजित आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्तव्य केले.

यावेळी पञकारांशी वार्तालाप कार्यक्रमात खासदार बापट म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजप ची तयारी पूर्ण झाली आहे तसेच संघटनेत संघटनात्मक बांधणीवर अधिक भर देण्यात आलेला आहे तसेच सत्तेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत विकासाची दिशा आमच्याकडे आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत शहरातील तिन्ही जागेवर पुन्हा महायुतीचे उमेदवार येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक यांनी आमदार जिग्नेश मेवानी यांची पिंपरीत सभा घेत भाजपला घरचा आहेर दिला आहे का? याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला गिरीश बापट यांनी उत्तर दिले आहे की, जिग्नेश मेवानी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली होती आणि भाजप नगरसेवकाने त्यांना शहरात बोलवले होते त्या नगरसेवकांची पक्ष श्रेष्ठीकडे तक्रार करून लवकरच कारवाई केली जाईल असेही बापट यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, लेखा विभागाचे सचिन पटवर्धन, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, उमाताई कापरे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक बाबू नायर, भाजपा शहर प्रवक्ते अमोल थोरात, माजी महापौर नितीन आप्पा काळजे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, नगरसेवक माऊली थोरात आदी मान्यवर उपस्थित होते

Share this: