कोणी कितीही केली माझ्यावर टीका तरी सत्ता कशी मिळवायची ती माझ्याकडून शिका- रामदास आठवले
मुंबई (वास्तव संघर्ष) – कोणी कितीही केली माझ्यावर टीका तरी सत्ता कशी मिळवायची ती माझ्याकडून शिका असे सांगत पक्षापेक्षा समाज मोठा आहे. आंबेडकरी समाज माझ्या पाठीशी उभा राहिला म्हणून मला ताकद मिळाली नाही तर मला कोणी विचारले नसते. आंबेडकरी समाज ज्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो त्यांना सत्ता मिळते ज्यांना लाथाडतो त्यांचा सत्यानाश होतो असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी नुकतेच मुलुंड सिमेंट कंपनी कंपाउंड येथे केले.
रिपब्लिकन पक्षाच्या मुलुंड तालुका शाखेतर्फे आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ; छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान गौतम् बुद्ध यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मनोज कोटक; प्रकाश गंगाधरे;रिपाइं मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शिलवंत; गौतम सोनवणे;नगरसेविका रजनी केणी; श्रीकांत भालेराव;अनिल गांगुर्डे;शिलाताई गांगुर्डे; विनोद जाधव; नामदेव गजर्मल; शरद आठवले;शिवा शिंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजात वेगवेगळे मतप्रवाह असतात. मी प्रत्येक राजकीय निर्णय आंबेडकरी समाजाला विचारून घेतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शासनकर्ती जमात होण्याचा संदेश दिला आहे.राजकारण ;निवडणुका या निवडून येऊन सत्ता मिळविण्यासाठी असतात. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता मिळविली पाहिजे.आंबेडकरी समाजामुळे माझ्या पक्षाने पाठिंबा दिल्या मुळे ज्यांना सत्ता मिळते ते माझ्या पक्षाला सत्तेतील वाटा देतात.मी काँग्रेस बरोबर होतो तेंव्हा राज्यात कॅबिनेट मंत्री होतो आता भाजप शिवसेने सोबत असल्यामुळे मला केंद्रियराज्यमंत्रीपद मिळाले आहे. नव्या मंत्रीमंडळात मला स्थान नक्की मिळेल त्यामुळे मला सत्ता मिळते मात्र ज्यांना सत्ता मिळत नाहीत त्यांचा जळफळाट होतो असे ना रामदास आठवले म्हणाले.