अभिनेत्री उर्मिला मातोंडकर विषयी फेसबुकवर अश्लील पोस्ट टाळणं भोवले, आरोपीला पुण्यात केली अटक
पुणे (वास्तव संघर्ष) सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकणे एकाला चांगलच भोवले आहे..
याप्रकरणी पुण्यामध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणात मनसेच्या रुपाली ठोंबरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन आज पुण्यात त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे..
धनंजय वेंकटेश कोळकर असे आरोपीचे नाव असून तो पुण्यातील बुधवार पेठेत वास्तव्यास आहे. आरोपीने ही पोस्ट शुक्रवारी टाकली होती, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी अत्यंत अश्लील भाषेत स्वतःच्या फेसबुक अकाउंट वर मजकूर प्रसिद्ध केला होता. महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांचे विषयी पोस्ट केली होती या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.