कच-यापासुन खतनिर्मिती प्रकल्प व सौरऊर्जा प्रकल्पाचे विरोधीपक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते उदघाटन
रहाटणी (वास्तव संघर्ष) पिंपळे सौदागर प्रभाग क्र. २८ येथील पार्क रॉयल सोसायटी येथे कच-यापासुन खतनिर्मिती प्रकल्प व सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर सोसायटीत साधारण १६०० लोकसंख्याआहे या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते.
पार्क रॉयल सोसायटीत एकूण ४३३ सदनिका आहेत.या सोसायटीत दररोज एकुण १.३टन ओला कचरा संकलित केला जातो.ओला व सुका कच-याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँट मधे संकलित करण्यात येतो.सोसायटीच्या विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. एकुण एक टन ओल्या व सुक्या कच-यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित झालेला कचरा प्लँट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे.
जागेवरच ओला व सुका कच-याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडुन करण्यात आला आहे.यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा,आणी आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा,घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे,उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे.
तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार वाटप करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे, सोसायटीचे चेअरमन अविराज सिंग , सेक्रेटरी उदय साबदे ,खजिनदार गोविंद अग्रवाल ,कमिटी सभासद मनोज शिनकर, नाजमीन अहमद, उदय पंडित, व सोसायटीमधील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांची , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्या बद्दल पार्क रॉयल सोसायटीच्या वतीने श्री. रघुवंश नारायण यांच्या हस्ते मा. नाना काटे यांच्या सत्कार करण्यात आला. सोसायटीतील नागरिकांना मार्गदर्शन करताना विरोधी पक्ष नेते मा. नाना काटे यांनी सांगितले कि कोट- कच-यापासुन खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही.ख-या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहुन वाटते.माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.