बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत जाहीर ; वर्षात नागरिकांना मिळणार हक्काचे घर

पिंपरी (वास्तव संघर्ष) :तीन महिन्यापुर्वी पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत काढली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक संघटना व नागरिकांनी मागणी केली होती की लवकरात लवकर प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत काढण्यात यावी. पण राष्ट्रवादी- भाजप यांच्या श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत दिरंगाई झालेल्या या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत 11 जानेवारी २०२१ रोजी दुपारी तीन वाजता चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आमदार तथा माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पञकार परिषदेत दिली. साधारणतः 3664 घराची ही सोडत असणार असून एक ते दिड वर्षात नागरिकांना हे हक्काचे घर मिळणार आहेत.असे देखील ते यावेळी म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च – होली , रावेत , बो-हाडेवस्ती येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे .प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडण्यायोग्य अशा घरांची निर्मिती केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांकडून अर्ज भरले गेले आहेत .

या योजनेसाठी अर्ज स्वीकृतीकरिता २ ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती.समाजिक संघटनेच्या तक्रारी आणि नागरिकांच्या विविध संघटनांच्या मागणीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी 11 जानेवारी २०२१ रोजी आॅनलाईन होणार असल्याची माहिती महापौर व सत्तारूढ पक्षनेते यांनी दिली पञकार परिषदेत महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके स्थायी समिती सभापती संतोष लोंढे उपस्थित होते.

Share this: