बातम्यामहाराष्ट्र

भारत हा बिनडोक लोकांचा देश आहे,लोकांना डाॅ.बाबासाहेबच काय तर संविधान देखील कळाले नाही-अॅड :असिम सरोदे

पुणे (वास्तव संघर्ष) भारत हा बिनडोक लोकांचा देश आहे, लोकांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच काय तर संविधान देखील कळाले नाही. त्यांनी संविधानात दिलेलं अभिव्यक्ति स्वातंत्र्यही उमजलं नाही. नथुराम गोडसे नाटक यायला हवं, नरेंद्र मोदी यांच्यावरील चिञपट आणि अ‌ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांच्यासारखे चिञपट देखील यायला हवेत. समाजाचं डोकं ठिकाणावर असेल तर काय चांगल काय वाईट हे समजेल. त्यामुळे चिञपटाची सेन्सॉरशिपही बंद झाले पाहिजे .असे परखड मत मानव अधिकार विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

मुक्तांगण फाऊंडेशन च्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त प्रेरणा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण कांबळे, उपाध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

पुढे बोलताना सरोदे म्हणाले, पुर्वी संवेदनशील विषयामधून समाजात जनजागृती केली जात होती, त्यासाठी चिञपट हे उत्तम माध्यम होतं परंतु आज चिञपटामध्ये प्रतिकात्मकता बदलण्यावर भर दिला जात आहे. चिञपटामध्ये शिवी वगैरे चालत नाही, समाजातील भाषा चिञपटामध्ये वापरण्यावर आक्षेप घेतला जातो. सेन्सॉर बोर्डाच्या नावावर चिञपट दडपले जात आहेत घटनाबाह्य सत्ताकेंद्र निर्माण होत आहेत यावर गांभीर्याने विचार करायला हवा. अभिव्यक्ति स्वातंत्र्य मुक्त असायला हवे.

Share this: