खासदार श्रीरंग बारणे यांना त्यांच्याच पक्षातील गटनेत्यांनी ‘पार्थ पवार यांची पावर दाखवून दिली?
पिंपरी(वास्तव संघर्ष ) चिंचवड मधील राजकीय भुकंपाचे पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांचा पुत्र, पार्थ पवार यांच्याबद्दल टिका केली होती ते म्हणाले . पार्थच काय, कोणीही पवार माझ्या विरोधात लढण्यास आले, तरी मला फरक पडणार नाही. कोण पार्थ पवार? अशी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड मनपा विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी त्यांना बुध्दीभष्ट्र झालेले खासदार अशी उपमाच दिली होती.
माञ, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहूल कलाटे तसेच भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातले सदस्य असलेले अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी काल रात्री राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने शहरातील राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांना त्यांच्याच पक्षातील गटनेत्यांनी ‘पार्थ पवार यांची पावर दाखवून घरचा आहेर दिला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ आघाडीमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला आला आहे. सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार माजी महापौर आझम पानसरे व राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘राष्ट्रवादी’ची ताकत असूनही अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची खेळी सुरू केली आहे.दरम्यान पार्थ पवार आणि शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांचा फोटो सोशलमिडीयावर वायरल होत आहे.