डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्याप्रकरणी तीन आरोपी महिला डॉक्टरांना अटक
मुंबई:नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही महिला डॉक्टरांना अटक पोलिसांनी केली आहे. काही दिवसांपासून या तीन आरोपी फरार होत्या. तसेच घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगानं मागितला आहे.
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात सीनिअर असलेल्या
डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल
या तिघींविरोधात ऍट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.