बातम्यामहाराष्ट्र

रामदास आठवले यांनी पुन्हा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली;कार्यकत्यांनी लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला

नवी दिल्ली(वास्तव संघर्ष) – नरेन्द्र मोदी यांचा दुस-यांदा प्रधानमंत्री पदाकरीता शपथविधी आज पार पडला, यामध्ये एनडीएचे मिञपक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले
यांना राज्यमंञिपदाची थपथ देण्यात आली. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी आठवले यांना पद आणि गोपनीयतेची शप्पथ दिली.

राष्ट्रपति भवनाच्या प्रांगणात प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या सहित ५० मंञ्यांची यावेळी शपथविधी पार पडला. यामध्ये एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना पुन्हा मोदी सरकार मंञीमंडळात स्थान देण्यात आले आहे. यावेळी रामदास आठवले यांनी पुन्हा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

केंद्रियमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंच्या निवासस्थानी झाली बुद्धपुजा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील भारत साकार करण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.नविदिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी बुद्धपुजा संपन्न झाल्यानंतर शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर देशभरातून आलेल्या चाहत्यांना संबोधित करताना ना रामदास आठवले बोलत होते.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांनी आज केंद्रियमंत्रीमंत्री म्हणून शपथविधीला जाण्यापूर्वी नविदिल्लीतील त्यांच्या सफदार जंग निवासस्थानी बुद्धपुजेचे आयोजन केले होते. त्यांच्या बंगल्यातील आवारात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या मूर्तीस विनम्रभावे श्रद्धापूर्वक वंदन करून ना रामदास आठवले केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे सहकुटुंब रवाना झाले.

रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असा निश्चित विश्वास रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नविदिल्लीत देशभरातील हजारो रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी ना रामदास आठवलेंच्या भेटीसाठी दिल्लीत गर्दी केली आहे. आज ना रामदास आठवले यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात नाव निश्चित झाल्या नंतर त्यांच्या सफदरजंग रोड वरील निवासस्थानी लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोलताशाच्या तालावर ज्येष्ठ रिपब्लिकन नेत्यांसह तरूण कार्यकर्त्यांनी ताल धरून नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा केला.

Share this: