बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रस्त्यांच्या कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अन्यथा आंदोलन-सतीश कदम 

पिंपरी-चिंचवड शहरांमधील रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी दिला आहे

पिंपरी(वास्तव संघर्ष) चिंचवड शहरांमधील रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी दिला आहे.महिना संपायला पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अजूनही रस्ते, गटारांची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही, असा दावा करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सगळीकडे रस्त्यांची खोदाई केली जात आहे. अमृत योजनेअंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भुमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्किल होत आहे. खोदाई केल्यानंतर खड्डे व्यवस्थितरित्या बुजविले जात नाहीत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या संपूर्ण भागात खोदाई केली आहे. अनेक ठिकाणी खोदाईची कामे सुरु आहेत. पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खोदाई केल्यानंतर खड्डे बुजविले गेले नाहीत. खड्डे व्यस्थितरित्या बुजविले जात नसून अर्धवट ठेवले जात आहेत. निगडी येथील मधुकर पवळे पुलाच्या बाजूला खोदाई केल्यानंतर रस्ता पुर्णपणे बुजविला नाही. मातीचे ढीग हटविले नाहीत. त्यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल होत आहे. तसेच वाहतूक कोंडीत देखील भर पडत आहे.

पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे महापालिकेने खोदाई करणा-या खासगी कंपन्यांकडून रस्ते पूर्ववत करुन घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजविणे गरजेचे आहे. खोदाई केलेले रस्ते खासगी कंपन्यांकडून व्यवस्थित बुजवून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिका अधिकारी, ठेकेदारांनी कामे पूर्ण करण्याचा शब्द पाळला नाही तर कामे सुरू असलेल्या रस्त्यावर ठाण मांडून बसणार असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पिंपरी, चिंचवडशहरातील नागरिक खोदलेले रस्ते, सिमेंट रस्त्यांच्या संथगती कामांमुळे हैराण आहेत. वाहतूक कोंडीची समस्या या कामांमुळे निर्माण होत आहे. तरीही प्रशासन ही कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हालचाल करीत नाही. येत्या दहा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. तरीही प्रशासन ही कामे तत्परतेने पूर्ण करण्यासाठी कोणतीही आघाडी घेत नाही. या पाश्र्वभूमीवर डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी अतिरीक्त आयुक्त दिलीप गावडे यांची भेट घेतली. त्यांना शहरात सुरू असलेली सिमेंट रस्ते, सेवा वाहिन्या, जल, मलनिस्सारणाची कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करावीत अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यात आली नाहीत तर या रखडलेल्या कामांच्या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी कामे सुरू असलेल्या ठिकाणी ठाण मांडून बसतील, असा इशारा देण्यात आला.

Share this: