बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादी युवती काॅग्रेसकडून कोरोना योध्दयांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून राखी हे विश्वासाच‌ं प्रतिक, हाच विश्वास मनात ठेवून पिंपरी चिंचवड शहरात डाॅक्टर,नर्स,सफाई कर्मचारी,पोलिस इ. सर्व कोरोना योद्धांसोबत तसेच वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आजचा रक्षाबंधन सण साजरा केला.

राष्ट्रवादी युवती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वर्षा जगताप वास्तव संघर्षशी बोलताना म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने कोरोनाच्या संकट काळात खऱ्या अर्थाने कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या कोरोना योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले.कोविड योद्धांनी या महामारीच्या संकट काळात जे योगदान व सेवा केली आहे ती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, त्या अनुषंगाने रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यामध्ये डाॅक्टर,नर्स,सफाई कर्मचारी,पोलिस इ. सर्व कोरोना योद्धांसोबत तसेच वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आम्ही आजचा रक्षाबंधन सण साजरा केला.

या उपक्रमात ,ऋतुजा,श्वेता,फातिमा, ज्योती,शलाका, हिना, स्नेहल आणि सोनाली यांनी सहभाग नोंदविला.

Share this: