‘धंदा करायचाय तर हफ्ता द्यायलाच लागल’ कोयता भाईची पिंपरीत दहशत
पिंपरी (वास्तव संघर्ष) : ‘मी इथला भाई आहे, धंदा करायचाय ना तर हफ्ता द्यायलाच लागल’ असे म्हणून दहशत निर्माण करणा-या एका भाईला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महेशनगर नवीन चौपाटी पिंपरी येथे घडली आहे.
पोलीस शिपाई विजय जानराव यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिपक ऊर्फ दिप्या सुरेश मोहिते (वय-30 , रा. विजयप्रभा हौसिंग सोसायटी नेहरूनगर पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिप्या याने पिंपरीतील महेशनगर नवीन चौपाटी येथे सार्वजनिक रोडवर एक लोखंडी कोयता असे घातक हत्यार विनापरवाना अनाधिकृतरीत्या बाळगून याठिकाणी बसलेल्या धंदेवाईक इसमांना “ ए भडव्यांनो , मी इथला भाई आहे , धंदा करायचाय ना तर हफ्ता द्यायलाच लागल . ” असे म्हणून शिवीगाळ करून धमकी देऊन दहशत पसरवित असताना मिळून आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.