क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गांधीनगर येथील मटका जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील गांधीनगर येथे मटका जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावनेसहाच्या दरम्यान
गांधीनगर , महात्मा फुले स्मारकाचे बाजुला , सार्वजनिक मोकळे जागेत घडली आहे.

सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस कर्मचारी सोनाली विलास माने यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जिलानी खान (वय-65 वर्षे रा. नेहरुनगर , पिंपरी) लक्ष्मण मुजमुले वय-50 रा. तापकीर नगर , काळेवाडी ) नारायण घोत्रे( वय-55 , गांधीनगर , पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावनेसहाच्या दरम्यान गांधीनगर , महात्मा फुले स्मारकाच्या बाजुला यातील आरोपी हे अवैधरित्या मटका जुगार अडा चालवत होते. त्यांनी अवैधरित्या स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळण्यासाठी चिठ्ठी , कार्बन , मोबाईल व रोख रक्कम असे एकुण 12,695 किंमतीचा मुद्देमाल खेळतांना व खेळवितांना मिळून आलेले आहेत. सदरील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: