मुजफ्फरनगरमध्ये दलितांचा हनुमान मंदिरावर कब्जा |
वास्तव संघर्ष वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हा दलित होता असे विधान केल्यानंतर प्रदेशातील सर्व दलित एकञ आले आणि त्यांनी हनुमान मंदिरावर आपला हक्क सांगत मंदिरात ठाण मांडले. आणि हनुमानाची पुजा अर्चना करु लागले ही घटना मुजफ्फरनगरमध्ये घडली .
राजधानी लखनऊ, आगरा नंतर वाल्मीकि क्रांति दल या संघटनेनी मुजफ्फरनगरमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन तेथील पुजारी सच्चिदानंद यांना धक्काबुक्की करत बाहेर काढले आणि हनुमानाची पुजा केली.
या घटनेनंतर राष्ट्रीय ब्राम्हण महासंघ आणि राष्ट्रीय परशुराम सेना या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत जिल्ह्य़ातील हनुमान मंदिराच्या परिसरात पोलीस बंदोबस्ताची मागणी केली.
दरम्यान हनुमान मंदिरात झालेल्या प्रकाराबद्दल वाल्मिकी क्रांति दल चे अध्यक्ष दीपक गंभीर म्हणाले आम्ही काही चुकीचे काम केले नाही काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होता असा दावा केला होता म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे आम्ही पुजा-यांला धक्काबुक्की केली नाही आम्ही फक्त मंदिरात गेलो आणि तेथील व्यवस्थापन आमच्या हातात घेतले