महाराष्ट्र

मी ऐंशी वर्षाचा असून मला कोर्टात बोलवू नये – संभाजी भिडें|

वास्तव संघर्ष :नाशिक-येथील कोर्टात श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर आज कोर्टात सुनावणी होती. “माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास जोडप्यांना अपत्यप्राप्ती होऊन त्यांना मुलगाच होतो , असा अजब दावा करणारे संभाजी भिडे आज दि ७ डिसें रोजी नाशिक कोर्टात हजर राहीले .

नाशिकमधील कोर्टात हजर राहण्याचे संभाजी भिडेंना आदेश होते. त्याप्रमाणे ते कोर्टात हजर राहण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले. आंबा प्रकरणावर सोशलमिडीयावर भीडे ट्रोल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टिका झाली होती. यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेने त्यांच्यावर कोर्टात केस टाकली होती.

संभाजी भिडे हे कोर्टात हजेरीसाठी येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात नाशिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी केली. दरम्यान नाशिक न्यायालयाच्या पांडे न्यायाधीशांनी संभाजी भिडेंना पंधरा हजाराच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर केला आहे. यावेळी मी ऐंशी वर्षाचा असून मला कोर्टात बोलवू नये असा अर्ज देखील संभाजी भिडेंनी कोर्टात केला आहे.

खालीलप्रमाणे संभाजी भिडेंनी दावा केला होता

भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन आठ – बारा वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली,. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.

Share this: