बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

दिव्यांग भगिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून केली रक्षाबंधन साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष): समाजामध्ये वावरताना माता-भगिनी सुरक्षित आहेत त्या आपल्या महाराष्ट्र पोलीस व पिंपरी चिंचवड पोलीस बांधवांच्या तत्पर कार्य सेवेमुळे ही जाणीव मनाशी बाळगून झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजुजी हिरवे त्यांच्यासोबत दिव्यांग महिला भगिनी नूतनताई रोहमारे, सारिका राजपूत, नवीना खंडागळे निगडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस बांधवांना राखी बांधून समाजाप्रती एक सुरक्षिततेची व समाधानाची भावना व्यक्त करीत रक्षाबंधन हा कार्यक्रम संपन्न केला.

यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे म्हणाले ,मी दिव्यांग भगिनींचे विशेष आभार व्यक्त करतो कारण ते शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असले तरी मनाने अत्यंत सक्षम सदृढ व समाजाप्रती काही करण्याची भावना त्यांच्यात आहे अशा महिला भगिनींचे मी निगडी पोलीस स्टेशन तर्फे मनापासून आभार व्यक्त करीत आहे

यावेळी निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे (गुन्हे विभाग)पोलीस निरीक्षक शंकरजी डामसे प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी राष्ट्रीय सैनिक संस्थेचे अध्यक्ष प्रताप जी भोसले पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतजी कुलकर्णी झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजूजी हिरवे पोलीस हवालदार किसनजी शिंदे ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी साळुंखे गुरुकुल अकादमीच्या नीलमजी गुप्ता इतर सर्व पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this: