धक्कादायक: चेअरमनपदी महिला असल्याने आठ ते दहा आरोपींनी केली बेदम मारहाण
पिंपरी (वास्तव संघर्ष) : बिल्डिंगच्या चेअरमनपदी महिला असल्याने आठ ते दहा आरोपींनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवार(दि.08) रोजी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास संग्राम हौसिंग सोसायटी विठ्ठल नगर पिंपरी येथे घडली आहे.
याबाबत पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संजय वाघमारे , महिला आरोपी, दुर्गप्पा ( पुर्ण नाव माहीत नाही),बापु शिंदे,सिध्दार्थ कोल्हे व त्यांचे इतर 2ते 3 साथीदार (सर्व रा.संग्राम हौसिंग सोसायटी,विठ्ठल नगर पिंपरी) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय याने फिर्यादी महिलेला वारंवार शाररीक सुखाची मागणी केली तसेच चेअरमनपदी फिर्यादी महिला असल्याने त्याचा राग मनात धरुन त्याच्या इतर साथीदारासोबत मिळून फिर्यादी महिलेला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली तसेच आरोपींनी फिर्यादी महिलेला पकडून त्यांचे टि शर्ट गळयापर्यंत वर उचलुन त्यांना उघडे केले व झाले प्रकाराबाबत कोणास काही एक सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस करित आहेत.