नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात पिंपरीत आंदोलन ;पोलिसांकडून ड्रोन द्वारे मोर्चावर नजर

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात आज (शुक्रवार) धरणे आंदोलन करण्यात आहे. या दरम्यान कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पिंपरी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त होते तसेच आंदोलन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ड्रोन द्वारे मोर्चावर नजर ठेवण्यात आली आहे.

विविध संस्था संघटनांचे मोर्चे नाशिक फाटा मार्गे, चिंचवड स्टेशन मार्गे तसेच नेहरूनगर, यशवंतनगर यासह काळेवाडी मार्गे पिंपरी चौकात दाखल होण्यास सुरूवात झाली. यामुळे दुपारी एक वाजल्यापासूनच पिंपरीतील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सेवा रस्त्याची वाहतूक ग्रेडसेपरेटरमधून वळविण्यात आली होती .

तसेच पिंपरी चौकात मोठ्याप्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आली होती . राज्य राखीव पोलिस दलाची तुकडीही सज्ज ठेवण्यात आली होती . काळेवाडी परिसरात रूटमार्च काढण्यात आला. आंदोलन करणाऱ्यांमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन, रयत विद्यार्थी मंच, ओबीसी संघर्ष समिती, बारा बलुतेदार संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित आघाडी, वडार सेवा संघ, समता परिषद, एम आय एम, युवक कॉंग्रेस, क्रांती महासंघ आदी संघटना सहभाग घेतला. (टिम – वास्तव संघर्ष)

Share this: