अरे बापरे! भोसरीतील पालिकेच्या दोन एकर जागेवर अनधिकृतपणे कंपनी मालकांचा ताबा ;थेट उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार
पिंपरी(वास्तव संघर्ष) :एमआयडीसी , भोसरी , जे ब्लॉक येथील टाटा मोटर्स कंपनीच्या बाजूच्या ‘ क’ मिळकत क्रमांक १७.२० व ५६ ही सुमारे २ एकर जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकडे हस्तांतरित करण्यात आली आहे .माञ येथील दोन एकर मोकळ्या जागेवर ताबा मारुन काही कंपनीमालकांनी ही मोकळी जागा वापरून तेथे लाखोंची उलाढाल करत पालिकेला लाखोंचा गंडा घातला आहे . त्या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या पत्राशेडवर पालिका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक कारवाई करीत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे .
तसेच या संदर्भात २८ सप्टेंबर २०२० ला पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. माञ ही तक्रार करून देखील संबंधित अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे .तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे , ‘ क ‘ क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कारवाईची मागणी केली . मात्र , अद्याप कार्यवाही झालेली नाही .
पिंपरी चिंचवड पालिकेतर्फे अनधिकृत बांधकामे , पत्राशेड , टपऱ्या , हातगाड्यावर धडक कारवाई केली जात आहे . मात्र , पत्राशेडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे शिदे यांनी तक्रारीत म्हटले आहे . याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे .