पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर आणि विरोधीपक्षनेते यांची सुरक्षा रामभरोसे
दिपक साबळे…! पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडल्यास अग्नि रोधक यंञ वापरले जाते या यंञामुळे आग आटोक्यात येऊन जीवीत हानी होत नाही. माञ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेच या यंञाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड मनपाच्या तीस-या मजल्यावर महापौर, उपमहापौर विरोधीपक्षनेते,शिवसेना-मनसे गटनेते कार्यालय, विषय समितीचे विविध अध्यक्षांचे कार्यालय आहे. इतकंच नव्हे तर कै दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह आहे या सभागृहातच स्थायी समिती अध्यक्ष पदाधिकारी यांची मिटींग महिन्यातून एकदा होत असते. माञ या सभागृहाशेजारचेच अग्नि रोधक यंञच कालबाह्य झाले असून सदर यंञाची तारीख दि.१५-८-२०१९ लाच एक्स्पायर झाली म्हणजे तब्बल चार महिने झाले आहेत.
दरम्यान, तीस-या मजल्यावर आग लागल्यास अग्नि रोधक यंञ बंद असल्यास महापौर उपमहापौर आणि विरोधीपक्षनेते व पालिकेतील सदस्यांची जीवाची पर्वा कोण करणार?पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर आणि विरोधीपक्षनेते यांची सुरक्षा रामभरोसे आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.