पिंपरीतील वायसिएम रूग्णालयात ढेकणांचा हैदोस ;रुग्णांना त्याचा त्रास- नसीम शेख यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (YCM) रुग्णालयात ढेकूण वाढले असून रुग्णांना त्याचा त्रास होत असून, तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीचे नसीम शेख यांनी महानगरपालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘या ढेकणांमुळे अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज लाखो रुपये वायसीएम वर खर्च केला जातो. रुग्णालयात आयसीयूमधील रुग्णांना उपचार मिळत नाहीत. वेळेवर गोळया व औषधे मिळत नाहीत, अपुर्या प्रमाणात औषध पुरवठा होत आहे. गंभीर स्वरुपाच्या आजारांवरची औषधे देखील उपलब्ध नाहीत’, तरी आयुक्तांनी त्वरीत या बाबींची दखल घ्यावी व कारवाई करावी, असे नसीम शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे.