बॅलेटपेपर इतिहासजमा झाले आगामी निवडणुका ईव्हीएमवरच होणार – मुख्य निवडणूक आयुक्त
वास्तव संघर्ष आॅनलाईन :- आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी महाराष्ट्रातल्या काही पक्षांनी केली होती. मात्र बॅलेटपेपर इतिहासजमा झाले आहे. आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी निवडणुक बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी केली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभा निवडणूक ईव्हीएमवरच होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच बॅलेट पेपर इतिहासजमा झाल्याचंही म्हटलं आहे त्याचसोबत ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो.
माञ ईव्हीएम सोबत कोणताही छेडछाड होणार नसल्याचे ही आरोरा यांनी स्पष्ट केले आहेतर सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीचा मुद्दा ही अरोरा यांनी पत्रकार परिषदेत मांडला. त्याचसोबत काही राजकीय पक्षांनी दिवाळीनंतर आगामी विधानसभा निवडणूक घ्याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे असेही ते यावेळी म्हणाले.