‘हप्ता दे… नाहीतर मी तुझा खुन करेन ‘असे म्हणून मागितली खंडणी
चिखली (वास्तव संघर्ष) : चिखलीतील ट्रॅव्हल्स बुकिंगचा व्यवसाय करणाऱ्या एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मला दर महिन्याला हप्ता द्यायचा नाहीतर गोळ्या घालून ठार मारेन ‘ असे म्हणत व्यावसायिकांकडून पाच हजार रुपयांची खंडणी घेतली आहे. ही घटना एप्रिल 2022 मध्ये कृष्णानगर भाजी मंडई चौक आणि 15 मे 2022 रोजी कृष्णानगर चौकात चिखली येथे घडली.
याबाबत राजू बिराजदार यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अनुप लांबट ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कृष्णानगर भाजी मंडई चौकात एका चहाच्या टपरीवर फिर्यादी आणि त्यांचा मुलगा थांबले असताना आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला फोन केला. फोनवरून शिवीगाळ , दमदाटी करत बोलावून घेतले आणि ‘ मला दर महिन्याला हप्ता दिला नाही तर इथून तुमची एकही ट्रॅव्हल्स गाडी जाऊ देणार नाही ‘अशी धमकी दिली . फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने बाजूला नेऊन त्याच्या कमरेला हात लावत म्हणाला ‘माझ्या जवळ पिस्तुल आहे हप्ता दिला नाही तर मर्डर करून टाकेन’ अशी आरोपीने जिवे मारण्याची धमकी धमकी दिली.
त्यांनतर 15 मे रोजी फिर्यादी हे कृष्णानगर चौक चिखली येथे ट्रॅव्हल्स एजन्सीच्या टपरीवर असताना आरोपी तिथे आला. ‘मला हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील, नाहीतर जीवे मारून टाकीन ‘अशी धमकी दिली . यापूर्वी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला धमकीला घाबरून फिर्यादी यांनी आरोपीला पाच हजार रुपये खंडणी काढून दिली आहे. अधिक तपास चिखली पोलीस पोलीस उपनिरीक्षक मुळीक करित आहेत .