क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत फोटो फ्रेमच्या दुकानाला भीषण आग

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीतील फोटो फ्रेमच्या दुकानाला एका आरोपींनी भीषण आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आगीत व्यवसायिकाचे एकून तीस लाख किंमतीच्या वस्तूचे नुकसान झाले आहे. ही घटना अशोकनगर , बिल्डींग नं 1 चे मागे पिंपरी येथे घडली आहे.

लक्ष्मण पोपट भालेराव (वय -36 ,रा. सुशिल डॅनिअल यांची भुतानी बिल्डींग, सुरेश ट्रेडर्स शेजारी पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण यांचे फोटो फ्रेम बनवण्याचे दुकान आहे. त्यांनी फोटो फ्रेम बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पत्र्याच्या गोडाऊनमध्ये कुलूप लावून बंद केले असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने कशाचेतरी सहाय्याने आग लावून पत्र्याचे गोडाऊन मधील एकूण तीस लाख किंमतीच्या फोटो फ्रेमचे बॉक्स एम.डी.एफ.(कार्ड बोर्ड ) व फोटो फ्रेम तयार करण्याचे कॉम्प्रेसर मशनरी इत्यादी पुर्णपणे जळून नुकसान केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही आरोपी फरार आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: