पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पुणे(वास्तव संघर्ष) पोलिसांनी पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटनखाण्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी छापा टाकून पाच विदेशी मुलींची सुटका केली. खडकवासला धरणाजवळील नांदेड सिटीजवळ एका मॉलमधील स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून थायलंडच्या पाच तरुणींची सुटका केली आहे.
ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मसाज सेंटर व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल याला अटक करण्यात आली. त्याचा साथीदार कादर शेख याचा पोलीस शोध घेत आहेत. ‘आर्चिड फाइड’ स्पा मसाज सेंटरमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहित एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठवले. तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या नांदेड सिटी जवळच्या मॉलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.