बातम्या

तरूणाच्या डोक्यात कोयता घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :तु माझ्याकडे का पाहत आहेस, मी कोण आहे तुला माहित नाही का’असे म्हणत आरोपींनी एका तरूणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी (दि.3) रोजी पिंपरीतील बौध्दनगर येथे घडली आहे.

ऋषिकेश गणेश बालगुडे (वय-21 रा .आंबेडकर कॉलनी रिव्हर रोड पिपंरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश राम (वय-21 रा . बिल्डींग नं-16 च्या मागे बौध्दनगर पिंपरी ) कुणाल कदम ऊर्फ चिक्या (वय-23 रा . बिल्डींग नं-16 च्या पाठीमागे बौध्दनगर ) दादया दिपक कदम( वय-21) व त्यांचे दोन साथीदार सर्व राहणार बौध्दनगर पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी ऋषिकेश यांचा मिञ शहबाज शेख हा गुरुवारी साडेदहाच्या सुमारास पिंपरीतील बौध्दनगर सुरेश यांच्या दुकानात खरेदी करीत असताना फिर्यादी आणि त्यांचा मित्र दुकानाच्या बाहेर थांबले असताना आरोपी गणेश राम याने’ तु माझ्याकडे का पाहत आहेस मी कोण आहे तुला माहित नाही का’ असे बोलुन त्याच्या सोबत असलेला आरोपी कुणाल कदम ऊर्फ चिक्या व आरोपी दादया दिपक आणि त्यांच्या इतर साथीदारांनी फिर्यादी ऋषिकेशला शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली . तसेच आरोपी गणेश राम याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादी ऋषिकेशच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: