क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सिमेंटचा गट्टू मारून पोलिसांला केले गंभीर जखमी;घटनास्थळावरून हल्लेखोर फरार

सांगवी (वास्तव संघर्ष): सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्लेखोरांनी सिमेंटचा गट्टू मारून गंभीर जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) पहाटे तीनच्या सुमारास सांगवी फाटा येथे घडली आहे. घटनास्थळावरून हल्लेखोर फरार झाले आहेत.

अमोल लावंड असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलीस कर्मचारी अमोल लावंड आणि पोलिस कर्मचारी कल्याण भोसले हे ड्युटीवर त्यांचे कर्तव्य बजावत होते. तेव्हा, त्यांना सांगवीतील मधूबन सोसायटी येथे चोर शिरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी अमोल आणि पोलिस कर्मचारी कल्याण भोसले हे दोघे चारचाकीतून तेथे जाण्यासाठी निघाले . दरम्यान, सांगवीतील घोलप महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर येताच त्यांना दोन चोर लपून बसलेल्याचे दिसले .

अमोल यांनी चारचाकी त्यांच्या जवळ नेऊन कोण आहात, इथे काय करताय असे हटकले असता त्यापैकी एकाने अमोल यांच्या दिशेने सिमेंटचा गट्टू फेकुन मारला तो थेट त्यांच्या भुवईवर लागला. या हल्ल्यामध्ये अमोल गंभीर जखमी झाले आहेत. अमोल यांच्यावर हल्ला झाल्याने सहकारी कल्याण भोसले हे त्यांच्या मदतीसाठी धावले असता या संधीचा फायदा घेत दोन्ही चोरटे पळून गेले. त्यानंतर, लावंड यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .अमोलवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Share this: