आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

‘वायसीएम ‘रुग्णालय सर्वसामान्य आजारांवरील रूग्णांच्या उपचारांकरिता सुरु-महापौर माई ढोरे

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचचवड कार्यक्षेत्रांतर्गत कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली असून महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेमध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा जीविताचा विचार करुन सामान्य , गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली .

कोरोना विषाणुच्या दुस – या लाटेतील वाढता संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत . प्रामुख्याने सर्व शहरवासीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेचे विविध पातळ्यांवर प्रयत्न देखील सुरु आहेत . त्या सर्व प्रयत्नांना ब – याच अंशी यश येऊन शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे .

तथापि शहरातील सर्वसामान्य नागरिक तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांना सहज , सुलभ व आर्थिक दृष्टया परवडणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध होणेकामी महानगरपालिकेचे शहरातील सर्वात मोठे समजले जाणारे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सर्वसामान्य आजारांवरील वैद्यकीय उपचारांकरिता सुरु करण्यात आले असून त्याचा शहरातील रुग्णांनी फायदा घ्यावा , असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .

Share this: