क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दिघीत घरगुती गॅस गळतीमुळे स्फोट ;स्फोटात 12 जण जखमी तर एकाचा मृत्यू

भोसरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी दिघीरोड महादेव नगर काॅलनी येथे सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 13 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. जखमी व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रात्रभर गॅस सिलेंडरमधून गॅस लिकेज झाल्याने हा स्फोट झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दिघी आणि भोसरीच्या हद्दीवर असलेल्या महादेवनगर येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये घडली.

ज्ञानेश्वर टेमकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टेमकर यांच्या पत्नी मंगला टेमकर (वय 27), मुलगी अनुष्का टेमकर (वय 7), मुलगा यशश्री टेमकर (वय अडीच वर्ष), श्री सातपुते, सौ सातपुते, सातपुते यांचा मुलगा आणि मुलगी अशी एका घरातील जखमींची नावे आहेत.

दुस-या घरात पाचजण जखमी झाले आहेत. यामध्ये महेंद्र सुरवाडे, अर्चना सुरवाडे (वय 35), मुलगी आकांक्षा सुरवाडे (वय 15), मुलगी दीक्षा सुरवाडे (वय 13), मुलगा अमित सुरवाडे (वय 8) हे जखमी झाले आहेत.

हा स्फोट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 102 मध्ये टेमकर यांच्या घरात झाला होता. शनिवारी रात्री टेमकर यांच्या घरातील गॅस सिलेंडर सुरु राहिला. रात्रभर सिलेंडरमधून गॅस लिकेज होत राहिला. रविवारी पहाटे घरातील व्यक्तींनी गॅस सुरु करण्याचा प्रयत्न केला असता गॅसचा स्फोट झाला. टेमकर कुटुंबातील चौघेजण यात जखमी झाले. .

या स्फोटाची दाहकता शेजारच्या फ्लॅट क्रमांक 103 मध्ये पोहोचली. त्या फ्लॅटमध्ये सुरवाडे कुटुंब राहत आहे. सुरवाडे पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा देखील यात जखमी झाले आहेत.दोन्ही घरातील सर्व साहित्याची पडझड झाली आहे. भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. टेमकर यांच्या कुटुंबातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली आहे

Share this: