केंद्र सरकार विरोधात पिंपरीत युवक काँग्रेसचे भिक मांगो आंदोलन;कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई
पिंपरी(वास्तव संघर्ष ) – क्रांती दिन व युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त बेराजगारी च्या प्रश्नावर केंद्र सरकार विरोधात पिंपरीतील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी काँग्रेस कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिस स्टेशन च्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले व भारतीय दंड विधान कलम १४९ नुसार नोटीस देऊन त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
देशात प्रचंड प्रमाणात असलेल्या बेरोजगारी च्या समस्येवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज युवक काँग्रेस च्या वतीने पिंपरी चौकात भीमसृष्टी जवळ निदर्शने आयोजित करण्यात आली होती मात्र निदर्शने सुरू होताच पोलिसांनी संबंधीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सध्या जमावबंदी कलम १४४ लागू असल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव अक्षय जैन, कौस्तूभ नवले, एनएसयूआय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले