क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रावण साम्राज्य टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करण्याचा डाव पोलिसांनी उधळला ;टोळीच्या सहा सदस्यांना अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड रावण साम्राज्य टोळीचा म्होरक्या मयत अनिकेत जाधव याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या सहा सदस्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केलीआहेत .रावण टोळीचे सदस्य हे अट्टल गुन्हेगार असून ते पिस्तुल घेऊन मयत अनिकेत जाधव याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी ( दि . 23 ) एकत्र आले होते . टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करून आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला ‘ रिप्लाय ‘ देणार होते . हा डाव पोलिसांना लक्षात येताच त्यांनी तो उधळून लावला.

अनिरुध्द ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजु जाधव ( वय 24 , रा . जाधववस्ती रावेत , पुणे ) , धिरज दिपक जयस्वाल ( वय 26 , रा.रस्टण कॉलनी , बिजलीनगर रोड , दत्तमंदीराजवळ , चिंचवड , पुणे ) , रोहन राजेंद्र कांबळे ( वय 24 , रा . गिरीराज हौसींग कॉम्प्लेक्स , बिजलीनगर चिंचवड पुणे ) , अमित भगिरथ मल्लाव ( वय 26 , बिजलीनगर चिंचवड पुणे ) , मंगेश देवीदास नाटेकर ( वय 22 , रा . रमाबाईनगर , रावेत पुणे ) , अक्षय लहु चौगुले ( वय 23 , रा . रस्टण कॉलनी , बिजलीनगर रोड , दत्त मंदीराजवळ , चिंचवड , पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीचा म्होरक्या मयत अनिकेत जाधव याचा जन्मदिवस केक कापून साजरा करुन विरोधी टोळीला रिप्लाय देणार असल्याची माहीती पोलीस अंमलदार शुभम कदम यांना मिळाली . त्यामुळे गुंडा विरोधी पथकाने जाधववस्ती , रावेत येथे अनिकेत जाधव याच्या घराला वेढा घातला . अनिकेत जाधव याच्या घरासमोर सहाजण आले असता पोलिसांनी छापा टाकून रावण टोळीच्या सहा जणांना ताब्यात घेतले . त्यामध्ये रावण टोळीचा प्रमुख आरोपी व मयत अनिकेत जाधव याचा भाऊ अनिरुध्द ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजू जाधव हा देखील होता . त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळला . पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त करून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या .

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 25 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . गुंडा विरोधी पथकाने लांडगेनगर , भोसरी येथे दुसरी कारवाई केली . त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे . क्षितीज सुभाष जाधव ( वय 19 , रा . केएम मार्टसमोर , लांडगेनगर , भोसरी , पुणे ) , प्रतिक रोहीदास ससाने ( वय 22 , रा . लांडगेनगर , भोसरी , पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . या आरोपींनी कोयत्यासह सेल्फी फोटो काढून तो फोटो व्हाटस अॅप स्टेटसवर ठेवला असल्याची माहिती पोलीस नाईक विजय तेलेवार यांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन धारदार कोयते जप्त केले आहेत .

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ,सहा पोलीस आयुक्त ( गुन्हे ) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने , पोलीस अंमलदार हजरत पठाण , प्रवीण तापकीर , गणेश मेदगे , विजय तेलेवार , रामदास मोहिते , प्रमोद गर्जे , शुभम कदम यांच्या पथकाने केली.

Share this: