पिंपरीत आठ ते दहा जणांनी केला एका तरुणांचा खून
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील एका तरुणाला तू वेडा आहेस असे म्हणून त्याला प्लॉस्टिकची खुर्ची , लाकडी स्टंप , लाकडी बाबुंने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करत जख्मी करून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी तीनच्या सुमारास पिंपरीतील मिलिंदनगर डिलक्स चौक येथे घडली आहे.
मनोज राजु कसबे (वय-25 रा. मिलिंद नगर पिपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पुष्पा राजु कसबे (वय 50 वर्षे , रा. मिलिंद नगर पिंपरी ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय-40, रा. क्यु बिल्डींन रुम-4 मिलिंद नगर पिंपरी ) शौकत समीर शेख( वय-32 रा . बिल्डींग नं . एन-14 मिलिंद नगर पिंपरी ) चिम्या उर्फ सुरेश निकाळजे व त्याचे साथिदार, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भुषण डुलगल व इतर साथीदार( सर्व राहणार पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी तीनच्या सुमारास पिंपरीतील मिलिंदनगर डिलक्स चौक येथे फिर्यादी पुष्पा यांचा मयत मुलगा मनोज कसबे यांना आरोपीनी ‘तु वेडा आहेस असे वारंवार चिडवत होते, त्यांना मयत मनोज याने’ मी वेडा नाही तुम्हीच वेडे आहात ‘असे म्हणाल्यावरही आरोपींनी मयत मनोज यांना पुन्हा एकदा’ तू वेडा आहेस, तू वेडा आहेस’ असे म्हणुन चिडवले. याचा राग येऊन मयत मनोज याने जवळ पडलेल्या काठीने आरोपींना मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर आरोपींनी चिडुन जावुन मयत मनोज यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्लॉस्टिकची खुर्ची , लाकडी स्टंप , लाकडी बाबुंने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी करुन जिवे ठार मारले. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.