दोन सुंदर नववधूचा शातिर दिमाग ,लग्नानंतर चार दिवसांनी समजलं धक्कादायक रहस्य
वास्तव संघर्ष आॅनलाईन जयपूर – लग्न म्हटलं की दोन जीवाचे मनोमिलन, लग्न या पवित्र बंधनास अपवित्र करण्याचे काम जयपुर मधील दोन सख्ख्या बहिणी ने केल्याची घटना उघडकीस आली आहे . या दोन बहिणी एकाच घरात लग्न करून एकाच दिवशी नांदायला आल्या. लग्नाच्या ४ दिवसांनंतर जे काही घडलं त्याचा कुणी विचारही केला नव्हता. चौथ्या दिवशी या दोघां सख्ख्या बहिणींनी चक्क आप-आपल्या नवऱ्याला दुधात औषध मिसळून बेशुद्ध केले. यानंतर घरातील सर्व दागिने लंपास करत पैसे घेऊन पोबारा केला . यासंदर्भात दोन्ही सख्खे भाऊ असलेल्या नवरदेवांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच आरोपी तरुणींचा कसून शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याने आरोप केला की त्याचे भाऊ रामनारायण आणि राजेश यांच्या लग्नासाठी गजानंद नावाच्या एका मध्यस्थाशी संपर्क साधला होता. गजानंदने अलवर येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट करून दिली. त्या ठिकाणीच दोन तरुणांना या तरुणींसोबत विवाह लावून देण्याच्या बदल्यात गजानंद व सुरेश यांच्या माध्यमातून ११ लाख रुपयांची मागणी केली. चर्चा करून त्यांना ११ लाख रुपये देण्यात आले आणि विवाहाची तारीख ठरली. फेब्रुवारीत झालेल्या लग्नावर 9 लाख रुपये खर्चही झाले. परंतु, २३फेब्रुवारीच्या रात्री दोघींनी आप-आपल्या नवरदेवांच्या दुधात गुंगीचे औषध टाकून मुद्देमालासह फरार झाल्या.
नवरदेव रामनारायण आणि राजेशने सांगितल्याप्रमाणे, “पहिल्या भेटीतच तरुणी इतक्या गोड बोलत होत्या की आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो. त्या रात्री सुद्धा त्यांनी अगदी प्रेमाने दुधाचा ग्लास पिण्यासाठी आणला होता. आम्ही नकार देऊच शकलो नाही. आम्हाला माहितीच नव्हते, की त्या आमच्यासोबत असे काही करतील. सकाळी शुद्ध आली तेव्हा घरातील सामान अस्त-व्यस्त होते. तेव्हा आमच्यासोबत काय घडले याचा पत्ता लागला.”