क्राईम बातम्यामहाराष्ट्र

मराठी माणसांनेच मराठी माणसांचा केला घात ;गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा व्यावसायिक स्पर्धेतून खून

पुणे (वास्तव संघर्ष): हल्ली मराठी माणसांने कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर त्याला प्रथम विरोध करतो तो मराठी माणूसच तर तोच व्यवसाय एका परप्रांतीयांनी सुरू केला तर त्याचे परप्रांतीय मिञ त्याला अजून मदत करुन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करताना महाराष्ट्रात दिसतात. मात्र आपला व्यवसाय नाही झाला तरी चालेल पण समोरच्या मराठी व्यवसायिकाचा गेम करायचा अशी मानसिकता ठेवूनच पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे ( वय 38 ) यांच्यावर काही दिवसांपूर्वी कोयत्याने सपासप वार करण्यात आला होता . या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आखाडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता . याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून व्यावसायिक स्पर्धेतून रामदास आखाडे यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे . एका मराठी माणसानेच मराठी माणसांचा व्यवसायिक स्पर्धेतून खून करत मराठी माणसांचाच घात केला.

बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय 56 ) , निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय 24 ) , निखिल मंगेश चौधरी ( वय 20 ) , गणेश मधुकर माने ( वय 20 ) , प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय 23 ) , अक्षय अविनाश दाभाडे ( वय 27 ) करण विजय खडसे ( वय 21 ) आणि सौरभ कैलास चौधरी ( वय 21 ) या आठ जणांना अटक केली आहे .तर या खुनात प्रत्यक्ष सहभाग असणारे दोघे जण अजून फरार आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 18 जुलै च्या रात्री रामदास आखाडे हॉटेल गारवाच्या बाहेर खुर्चीवर फोनवर बोलत बसले होते . यावेळी त्या ठिकाणी आलेल्या रामा वायदंडे याने तलवारीने त्यांच्या डोक्यात जोरदार वार केले आणि तो पळून गेला . गंभीर जखमी झालेल्या रामदास आखाडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता . पोलिसांच्या तपासात रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला असल्याचे निष्पन्न झाले . गारवा हॉटेल शेजारी आरोपी बाळासाहेब खेडेकर यांचे हॉटेल होते . रामदास आखाडे यांचे हॉटेल कायमस्वरूपी बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर यांनी त्याचा आरोपी भाचा सौरभ चौधरी याला खून केल्यानंतर रोज दोन हजार रुपये देईल अशी सुपारी देण्याचे ठरले आणि आखाडे यांचा खून करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी चौधरी याने इतर आरोपींच्या मदतीने आखाडे यांच्यावर हल्ला केला होता.या हल्ल्यात त्यांचा खून झाला. पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Share this: