खळबळजनक:करणी आणि अंधश्रद्धेच्या नावावर खडकीतील झाडाला लावल्या हजारो काळ्या बाहुल्या
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील खडकी परिसरात अंधश्रद्धेचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. खडकीतील म्हसोबा मंदिराच्या आवारातील एका झाडाला करणीच्या नावावर काळ्या बाहुल्या, लिंबू, नारळाला टोचलेल्या पिना, बिबवे ईत्यादी लावून झाडाचे विद्रुपिकरण करण्यात आले आहे. करणी लावण्यासाठी किंवा करणी काढण्यासाठी म्हणून अशा अंधश्रद्धेचा उपयोग करून लोकांना फसवले जाते .
यामुळे अनिष्ट , अघोरी गोष्टी करून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले जात होते . मुख्य म्हणजे “ जादूटोणा विरोधी कायदा ” असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही.
या अंधश्रद्धेला कोणी बळी पडू नये तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हसोबा मंदिराच्या आवारातील झाडांना लावलेल्या हजारो काळ्या बाहुल्या काढून झाडांना मुक्त करण्यात आले .
गेली चार वर्षे सातत्याने अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या गोष्टीचा पाठपुरावा करत असून त्यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. तसेच या झाडाना ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून त्या जाळण्यात आल्या आणि झाडाला या अंधश्रद्धेतून मुक्त करण्यात आले.अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.