बातम्या

सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांची गांधिगिरी खड्ड्यांत बसून आंदोलन:महापालिका प्रशासनाचा केला निषेध

चिखली(वास्तव संघर्ष) : चिखली-आकुर्डी, सोनवणे वस्ती या रोडची पहिल्याच पावसांत चाळण झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांतून गाडी चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. याच्या निषेधार्थ चिखलीतील सामाजिक कार्य़कर्ते विकास साने यांनी खड्ड्यांत बसून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करून, महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. खड्डे चुकवून गाडी चालवताना, अपघाताचे प्रमाण वाढते आहे. चिखली-आकुर्डी रोड आणि चिखली- सोनवणे वस्ती रोड ची पहिल्याच पावसांत चाळण झाली आहे. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्या साचलेल्या पाण्यात बसून सामाजिक कार्यकर्ते तथा चिखली मोशी हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने यांनी प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केले.चिखलीतील रस्ते खड्डे मुक्त करा…असा नारा देत महापालिका प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरात-लवकर रस्ते दुरुस्त न केल्यास अजून वेगळ्या पध्दतीने आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, विकास साने म्हणाले, प्रभाग एक मधील चिखली-आकुर्डी रोड- सोनवणे वस्ती रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत महापालिका प्रशासनास वारंवार निवेदन दिले आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम म्हणून पहिल्याच पावसांत ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. वाहनचालकांना तसेच परिसराताली नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. लवकरात-लवकर हे रस्ते दुरुस्त करावे, अन्यथा अजून वेगळ्या पध्दतीने आंदोलन करू, असा इशारा प्रशासनास दिला आहे.

Share this: