बातम्या

कॉग्रेस म्हणते म्हणून प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी पञकार परिषद घेणे म्हणजे बाळीशपणाचे – विश्वास पाठक


पिंपरी – (वास्तव संघर्ष) राफेल व्यवहार नेमका काय आहे, यूपीए सरकारच्या काळात या व्यवहाराबाबत कशी दिरंगाई झाली, या व्यवहारात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा सहभाग का नाही, रिलायन्स कंपनी या व्यवहारात काय भूमिका पार पाडणार यासंदर्भात पाठक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, प्रमोद निसळ, अमोल थोरात, संजीवनी पांडये, आर. एस. कुमार आदी उपस्थित होते.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल पत्राच्या आधारावर या व्यवहारातील विमानांच्या किमती, त्याबाबत विरोधक करत असलेले आरोप याबाबतही पाठक यांनी खुलासा केला विरोधकांनी जनतेसमोर पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असेल तर भाजपही त्याचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार आहे असे पाठक ठामपणे म्हणाले.
राजकीय लाभासाठी देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार गेल्या 70 वर्षापासून काँग्रेसचे विविध नेते करीत आहेत. हे नवीन नाही असे सांगताना श्री. पाठक म्हणाले राफेल विमानाची निवड 2012 मध्ये काँग्रेसच्या शासनानेच केली. पण कराराबाबत दोन्ही देशात एकमत होत नव्हते. कारण तेथे दलालीचा विषय निकाली निघत नव्हता.  2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सुत्रे स्वीकारली आणि संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी सुत्रे स्वीकारली आणि या प्रकरणाची सुरुवात झाली. तोपर्यंत विमान खरेदी प्रकरण काँग्रेसने बासनात गुंडाळून ठेवले होते. काँग्रेसने केलेला करार फ्रान्सच्या द-सॉल्ट एव्हिएशन कंपनीला मान्य नव्हता. आता हा करार का मान्य नव्हता या खोलात गेल्यास त्याची खरी कारणे समोर येतीलच. ते यथावकाश कळेलच.
केवळ विरोधासाठी विरोध करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांच्या अकलेची कीव आल्याशिवाय राहत नाही.

खरेच हा सौदा महागात पडला काय? यांचे स्पष्ट उत्तर नाही असेच आहे, हे सांगताना विश्वास पाठक म्हणाले, काँग्रेस शासनाने आणि आताच्या मोदी सरकारने केलेल्या या करारात खूप मोठा फरक आहे. कुठलाही फरक लक्षात न घेता काँग्रेसवाले आणि त्यांचे गल्लीतले नेते केवळ किमतींच्या अनुषंगाने मोदीवंर टीका करीत आहे. ही टीका म्हणजे बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचा आरोप पाठक यांनी केला.

याप्रसंगी ड-सॉल्ट एव्हीएशन भारताला केवळ विशिष्ट बदल केलेले राफेल देण्यास कबूल झाले आहेत. या खरेदी व्यवहारात दोन अत्याधुनिक क्षेपणास्त्र पुरवण्याच्या कराराचाही समावेश असल्याने पाठक म्हणाले, या सौद्यात फ्रान्सने “ परफॉर्मन्स बेस्ट लॉजिस्टिक सपोर्ट ” देण्याची हमी दिल्याने ताफ्यातील 75 टक्के विमाने कोणत्याही वेळेला उड्डाण घेण्यासाठी तयार राहणार आहेत, असे सांगताना विश्वास पाठक म्हणाले; सौदा प्रत्यक्ष किंमत आणि युरोपीय महागाई दराचे गणित लक्षात घेऊन हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे जास्त पैसे वाचवण्यात संरक्षण मंत्रालयास यश  प्राप्त झाले.

राफेल विमान खरेदीच्या कराराची ही वस्तुस्थिती पाहता काँग्रेसने केलेले आरोप आणि टीका ही केवळ राजकीय लाभापोटी आणि राजकीय वातावरण गढूळ करण्याच्या उद्देशाने केली आहे, हे स्पष्ट होते. या करारातील भारताला फायदेकारक असलेले तांत्रिक मुद्दे काँग्रेसने जनतेसमोर ठेवले नाही. केवळ विरोधासाठी विरोध करुन जनतेची दिशाभूल तेवढी केली जात असल्याचेही पाठक म्हणाले. राहूल गांधी हे बाळीशपणे बोलतात राफेलसंदर्भात त्यांची माहिती चुकीची आहे. कॉग्रेस म्हणते म्हणून प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी पञकार परिषद घेणे म्हणजे बाळीशपणा चे लक्षण आहे असेही ते यावेळी म्हणाले.
Share this: