क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकूहल्ला ;निगडी पोलीसांनी एकाला केली अटक

निगडी (वास्तव संघर्ष) मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर एकाने चाकूने हल्ला केला आहे . ही घटना मंगळवारी (दि .25 ) सकाळी साडे सातच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांच्या हाताला टाके पडले आहेत .

शेट्टी (वय पुर्णनाव पत्ता माहित नाही) असे हल्लेखोरांचे नाव आहे

सविस्तर वृत्त असे की,पिंपरी चिंचवडमधील निगडी प्राधिकरण याठिकाणी सोनाली कुलकर्णी हिचा ‘ वरलक्ष्मी ‘ या नावाने घर आहे. या घरी सकाळी एक चोरटा चाकू आणि प्लास्टिकची पिस्तुल घेऊन इमारतीच्या आत घुसला . त्यानंतर समोर आलेल्या एका महिलेवर त्याने स्प्रे मारला . हा चोरटा दुसऱ्या मजल्यावर गेला याठिकाणी सोनाली कुलकर्णी यांचा परिवार राहतो .अनोळखी व्यक्ती असल्याने सोनालीच्या वडीलांने त्याला हटकले त्यानंतर सोनाली कुलकर्णीचे वडील व चोर यांच्यात धरपकड झाली . यावेळी चोराने त्यांच्यावर धारधार चाकूने हल्ला केला . या हल्ल्यात त्यांच्या हताला गंभीर जखम झाली . त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले . अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत .

Share this: