क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिंचवड अजंठानगर येथे वाहनांची तोडफोड करत टोळक्‍याची दहशत

पिंपरी ( वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड मधील अजंठानगर येथे पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने १३ वाहनांची तोडफोड केली आहे . ही घटना रविवारी ( दि. २) निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार , रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सात ते आठ जणांचे टोळके अजंठानगर परिसरात आले . त्यांनी लाकडी दांडके , दगड तसेच इतर हत्यारांनी परिसरातील तेरा वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे . या घटनेतील एका आरोपीची ओळख पटलेली आहे . तो २०१७ मध्ये अजंठा नगर परिसरातून इतर ठिकाणी राहण्यास गेला आहे . पूर्ववैमनस्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .अधिक तपास पोलीस करत आहेत

Share this: