हेल्पर ते खासदार असा घेतला जातीचा फायदा ; अखेर जयसिद्धेश्वर स्वामीं चा जातीचा दाखला रद्द
वास्तव संघर्ष आॅनलाईन -भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट असल्याचा अहवाल सोलापूरच्या जात पडताळणी समितीने दिला आहे . याप्रकरणी समितीने खासदार डॉ . जयसिद्धेश्वर महास्वामी यांना नोटीस बजावली होती ,आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी त्यांचा जातीचा दाखला बनावट सिद्ध झाल्याने डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा अनुसूचित जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे . खासदार स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली होती . या तक्रारीनुसार जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला.
हेल्पर ते खासदार असा घेतला ‘स्वामीं नी जातीचा फायदा
सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, सदस्य सचिव संतोष जाधव व सदस्या छाया गाडेकर यांनी महापालिका परिवहन खात्यातील निवृत्त समयलेखक विश्वनाथ स्वामी यांचा माला जंगम जातीचा दाखला असल्याचा दावा अमान्य केला आहे.
याबाबत परिवहनमधील निवृत्त मुख्य वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीकडे ३ डिसेंबर २0१४ रोजी तक्रार केली होती. स्वामी हे परिवहनमध्ये हेल्पर म्हणून रुजू झाले होते. त्यांनी अनुसूचित जाती अंतर्गत बनावट कागदपत्राआधारे जातीचा दाखला घेऊन परिवहन सेवेमध्ये पदोन्नतीचा लाभ घेतला. हेल्पर असताना ते समयलेखर, लिपिक, सभापतींचे स्वीय सहायक या पदावर गेले. समय लेखापाल म्हणून नियुक्ती झाल्यावर केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पुन्हा समयलेखक पदावर नेले. आता स्वामी निवृत्त झालेले असून, त्यांनी घेतलेल्या लाभावर परिवन काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागी बनावट जातीचा दाखला देवून निवडणूक लढविली आणि खासदारकी मिळवली त्यामुळे स्वामी यांनी प्रथम परिवहन विभागाला बनावट दाखला देऊन जातीचा फायदा घेतला त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. स्वामी हे जंगम समाजाचे इतर मागास प्रवर्गात मोडत असताना त्यांनी माला जंगमचे जात प्रमाणपत्र मिळविल्याचे दिसून आले. तसेच त्यांचा भाऊ परिवहन खात्यात व मुलीने शिक्षणासाठी जंगम जातीचे वैधता प्रमाणपत्र घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वामी यांचा दाखला रद्द करण्यात आला आहे.