आजपासून आरटीई प्रवेशांच्या नोंदणीला सुरवात; येथे करा अर्ज
महाराष्ट्र (वास्तव संघर्ष): मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या 25 टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून बुधवार(दि.1) मार्चपासून दुपारी 3 वाजल्यापासून सुरुवात होणार असून पालकांना 17 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.यासाठीची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.राज्यातील सर्व शाळेची नोंदणी पुर्ण झाल्यानंतर आता प्रवेशासाठीची नोंदणी होणार आहे.
पालकांनी आरटीई अंतर्गत अर्ज भरताना जास्तीत जास्ती 10 शाळांची निवड करायची आहे. त्यासाठी गुगल मॅपचा वापर करत घरापासून शाळेचे स्थान निश्चित करायचे आहे. यामध्ये पालकांना केवळ पाच वेळेस स्थान निश्चित करता येणार आहे. Student. Maharashtra. Gov. in या बेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकता.
आरटीईसाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे सादर करावे लागतील त्यासाठी निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यातील एका पुरावा ग्राह्य धरता येण्यार आहे. या शिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकाना सादर करावी लागणार आहेत.