अन् त्यांनी बॅंक अधिका-यांनाच धक्काबुक्की करत काढले बाहेर
निगडी (वास्तव संघर्ष) : कर्जाचे हप्ते न भरलेल्या एका व्यक्तीच्या घरावर बॅंकेने जप्ती केली होती. घरातील साहित्याच्या बहाण्याने त्यांने आपल्या मित्रांसोबत मिळून बॅंक अधिकारी आणि कर्मचा-यांना धक्काबुक्की करत घरातून बाहेर काढले आहे. ही घटना तोरणा कृष्णा हौ. सोसायटी तोरणागड प्राधिकरण निगडी येथे बुधवारी (दि.1) मार्च रोजी घडली आहे.
उमेश किसन महाजन यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निल सुभाष कणसे (रा . कृष्णा होंसि सोसा. तोरणागड प्राधिकरण निगडी) अमित हरिभाऊ शेवाळे ,भुषण रविंद्र पाटील अक्षम बाबुराव शिंगोटे,झांबरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी निल कणसे याने दि. सातारा सहकारी बँक लि. शाखा- मालवणी मालाड येथून रो-हाऊसवर जमीन इमारत तारण कर्ज रुपये 40 लाख घेतले होते.निल कणसे याने काही दिवस त्या कर्जाचे हफ्ते भरले मात्र पुन्हा कर्जाचे हफ्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेने आरोपी निल कणसे यांनी कर्जाचे हफ्ते न भरल्याने सदर मिळकतीचा कायदेशीररित्या ताबा घेतला.
सदर मिळकतीचा लिलाव केल्यानंतर आरोपी निल कणसे यांनी सदर मिळकतीमधील साहित्य त्यांना माघारी देण्यात यावे अशी विनंती बँकेला केल्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी निल कणसे यांना त्याचे साहित्य माघारी देण्याकरिता मिळकतीच्या ठिकाणी आले असता आरोपीने त्याचे 4 ते 5 सहकारी मित्रांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच दमदाटी करून मालमत्तेमधुन नबरदस्ती बाहेर काढले व मालमत्तेला असलेल्या कंपाउंडच्या गेटला स्वतःचे कुलूप लावुन सदर मालमत्तेवर बँकेचे वसुली अधिकारी यांचा कायदेशीर ताबा असताना सदर मालमत्तेवर त्यांच्या सहका-यांच्या मदतीने गैरमार्गाने बळजबरीने बेकायदेशीररित्या जबरदस्ती ताबा घेतला आहे.आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.