बातम्या

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी या प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा 10% रक्कम भरण्यासाठी दि.15 डिसेंबर 2021 ते दि.15 जानेवारी 2022 दरम्यानची मुदत देण्यात आली आहे. या प्रकल्पा मध्ये ज्या लाभार्थ्यांची नावे विजेता यादीमध्ये आहेत व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी आपला 10% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात दि.15 डिसेंबर 2021 पासून येऊन चलनाद्वारे आपली स्वहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व मा.आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

सदर योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी एकुण 3664सदनिका बांधण्यात येते आहे. त्या पैकी बोऱ्हाडेवाडी येथे 1288 व चऱ्होली येथे 1442असे सदनिका वाटप करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पुर्ण झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

https://www.pcmcindia.gov.in/marathi/pmay_iresult.php
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांचे नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग 205 व्यापारी संकुलन,भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे-33 या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे.

Share this: