क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

लोखंडी रॉडने मारहाण करीत एकाचा केला खून

वाकड (वास्तव संघर्ष) : दारू पिताना झालेल्या भांडणातून लोखंडी रॉडने मारहाण करीत सोबत राहणाऱ्या तरुणाने गवंडीकाम करणाऱ्या मजुराचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री नऊच्या सुमारास चौधरी पार्क, वाकड येथे घडली .

गुरुनाथ किसन सुतार (वय 32, रा. वाकड परिसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मयत गुरुनाथ यांची बहिण रोहिणी रविंद्र सुतार (वय 41, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दत्ता पटेकर (वय 23, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गुरुनाथ हा गवंडीकाम करीत होता . शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चौधरी पार्क येथील मोकळ्या  जागेत दारू पित असताना गुरुनाथ आणि आरोपी दत्ता यांचे भांडण झाले. त्यावेळी चिडलेल्या आरोपी दत्ता याने लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गुरुनाथ याचा मृत्यू झाला.अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत

Share this: