क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत एकावर चाकूने जीवघेणा हल्ला

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीत एकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.26) रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ, जुना बाथरूमच्या पाठीमागे गांधीनगर पिंपरी येथे घडली आहे.

महादेव मरिप्पा म्हेत्रे( वय-42, रा. हनुमान मंदिराजवळ, जुना बाथरूमच्या पाठीमागे, गांधीनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आक्का ऊर्फ राकेश काळूराम गोरखा ( वय-27, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भांडेकर यांच्या खोलीकरीता पुरूष भाडेकरू आणला असता फिर्यादीने त्यास पुरूष भाडेकरू करीता विरोध केला असता त्याचा राग येवून आरोपी ने फिर्यादीला शिवीगाळ करत आता तुला फाडतो अशी धमकी देवून निघून गेला. नंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी हे एकटा राहते घरी पलंगावर आराम करीत टिव्ही बघत पडले असतांना आरोपी याने चिडून जावून फिर्यादीचे घरात घुसून तुला आता खल्लास करतो असे म्हणून फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील चाकू फिर्यादीच्या छातीच्या खाली पोटारवर जोरात वार करून फिर्यादीला गंभीर जखमी करून पळून गेला आहे. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: